महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताही विचार नाही : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

171

सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारकडून सुनावनीसाठी पुर्ण क्षमतेने मांडणी केली जात असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. 

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये किंवा अभियांत्रिके महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. 

राज्यात ८ वी ते १० वी आणि ११ वी १२ चे वर्ग पुर्ण काळजी घेत सुरू असताना महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये (colleges or engineering colleges) बंद का असे त्यांना विचारले असता ते म्हणाले.

सध्या कोरोनाची स्थिती काय आहे हे आपल्याला माहितच आहे. तर कोरोनाचा नवा विषाणूही सापडला आहे. त्यामुळे सध्या महाविद्यालये किंवा अभियांत्रिके महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

काही दिवसात कोरोनाचे लसीकरण सुरू होईल. लसीकरणाचा पहिला, दुसरा, तिसरा टप्पा होवू द्या त्यानंतर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी बैठक घेऊन महाविद्यालये किंवा अभियांत्रिके महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ असेही सामंत यांनी म्हटले आहे. 

तसेच सामंत म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी चर्चा केली जात आहे. महाविद्यालये किंवा अभियांत्रिके महाविद्यालये सुरू करण्याआधी जिल्ह्या जिल्ह्यातील महाविद्यालये आणि वसतीगृहे पुन्हा क्वॉरंटाईन सेंटरला देण्यात आली आहेत का? हे तपासले जात आहे.

विद्यार्थ्यी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यामुळे पुन्हा कोरोना फैलावला जाणार नाही याची दक्षता घेतली जात असल्यानेच महाविद्यालये किंवा अभियांत्रिके महाविद्यालये सुरू करण्यात आलेली नाहीत असे सामंत म्हणाले.

तसेच यावेळी सामंत यांनी, मराठा आरक्षणाबाबतीत बोलताना, मराठा समाजाच्या मागे राज्य सरकार खंबारपणे उभे असल्याचे सांगितले.

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिला जाईल हा फक्त गैरसमज असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसीतून कोणत्याच समाजाला आरक्षण देण्यात येणार नसल्याचे सांगितल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here