मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकरचा अपमान नाही, तर भारताचा व प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे. त्यामुळे या प्रकरणामागे जर कॉंग्रेस असेल तर निंदनीय आहे.
सचिन तेंडूलकर यांच्या मताशी असहमत किंवा सहमत होऊ शकता. सचिन तेंडुलकरला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याने मत मांडले तर बिघडले कुठे? फक्त राजकारण म्हणून सचिन तेंडूलकरला निशाना केला जात आहे.
आपल्या खेळाने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या ‘भारतरत्न’ खेळाडूचा अपमान तेच करू शकतात, ज्यांची विचारधारा व देशाप्रतीच्या निष्ठेत खोट असेल, असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला इंटरनॅशनल पॉप स्टार रिहाना, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग आणि पॉर्न स्टार मिया खलिफाने समर्थन देत ट्विट केले.
मात्र, यानंतर सोशल मीडियावर रणकंदन माजले. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे, असे सांगत देशातील सेलिब्रेटींनी यामध्ये उडी घेतली आणि अप्रत्यक्षपणे रिहानावर टीका केली.
सचिन तेंडुलकरने ट्विट करत अप्रत्यक्षपणे रिहानावर टीका केल्याचे समोर आल्याने, सचिनबद्दल विविध प्रतिक्रिया समोर आहेत.
केरळमध्ये तर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या फोटोवर काळे ओतून त्याचा निषेध नोंदविला. यावरून चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे.
-
“आपण सचिन तेंडुलकरच्या मताशी असहमत किंवा सहमत होऊ शकता, पण आपल्या खेळाने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या अशा खेळाडूचा अपमान तेच करू शकतात, ज्यांची विचारधारा व देशाप्रतीच्या निष्ठेत खोट असेल. हा केवळ भारतरत्न सचिन तेंडुलकरचा अपमान नाही, तर भारताचा व प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे”, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
याचबरोबर, “एकदा केरळ येथील युवक काँग्रेसने बीफ बॅनविरुद्ध आंदोलन करत असताना गौमातेला भर रस्त्यात कापून टाकल्याचे दृश्य संपूर्ण देशाने पाहिले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा गौरव असणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचा केरळ युवक काँग्रेसने केलेल्या अपमानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो!”, असे ट्विट करून चंद्रकांत पाटील यांनी युवक काँग्रेसच्या कृतीचा निषेध नोंदवला आहे.
याशिवाय, “राहुल गांधी केरळमधील वायनाडचे खासदार आहेत, हे सर्व जर राहुल गांधींच्या समंतीने घडले असेल तर यापेक्षा लज्जास्पद देशासाठी अधिक काही असू शकत नाही.
देश आणि देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही काँग्रेसची परंपरा झाली आहे”, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.