गुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मोहन भागवत सध्या आसाम दौऱ्यावर आहेत.
आसाम दौऱ्यावर असताना मोहन भागवत यांनी सीए आणि एनआरसी विषयी बोलताना मुस्लिम लोकसंख्या आणि पाकिस्तानवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
आज मोहन भागवत यांनी सीएए-एनआरसीवर लिहिल्या गेलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन केले.
या प्रकाशन सोहळ्यात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, भारतामध्ये 1930 पासून योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिम समुदायाची संख्या वाढवण्यात आली.
सिंधसह, बंगाल, आसामला पाकिस्तान बनवण्याची योजना होती. मात्र, ही योजना यशस्वी झाली नाही आणि फक्त पाकिस्तान तयार झाले.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात अल्पसंख्यांकांवर विशेष लक्ष ठेवले जाईल, असे सांगितल्यापासून भारतात अल्पसंख्यांकांची काळजी घेतली जात आहे.
सीएएमुळे कोणत्याच मुस्लिमाचे नुकसान होणार नाही, असे देखील भागवत यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, मोहन भागवत 4 जुलै रोजी एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिले होते.
यावेळी देखील त्यांनी भारतीयांचा DNA एकच असल्याचे म्हटले होते. यानंतर देशभरातून यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या.