रबीला पाणी देण्यासाठी विहिरीत पानबुडी वीजपंप सोडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. औसा तालुक्यातील आलमला येथे बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
औसा तालुक्यातील आलमला येथे दिवसाची वीज असल्याने रबी पिकांना पाणी देण्याच्या उद्देशाने बुधवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास तरुण शेतकरी राहूल गुरुनाथ बिराजदार (३०) व त्यांचे बंधू शरणाप्पा गुरुनाथ बिराजदार (२८) हे आपला सालगडी राम एकनाथ रंणदिवे (३०) याच्यासह शेतीत गेले.
भाऊ विहिरीत पडल्याने त्याला वाचविण्यासाठी शरणाप्पानेही विहिरीत उडी घेतली. मात्र त्यालाही पोहता येत नसल्याने दोघे गटांगळ्या खात असल्याचे पाहून सालगडी रामने दोघांना वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली.
मात्र दोघांनीही त्याचा आधार घेण्याच्या धांदलीत रामची ताकद कमी पडल्याने तो विहिरीबाहेर आला दोघांनाही तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करुन दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले.