सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी महिलेचे आपल्याचं मुलासह अश्लील नृत्य व्हायरल, महिला आयोगाकडून गंभीर दखल

583
DCW chief Swati Maliwal

नवी दिल्ली : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जात आहेत. सध्या सोशल मिडीयावर एक धक्कादायक व किळसवाणा व्हीडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका महिलेने आपल्या 10-12 वर्षाच्या मुलासह अत्यंत अश्लील नृत्य केले आणि व्हिडिओ व्हायरल केला.

दिल्ली महिला आयोगाने या व्हिडिओची गंभीर दखल घेत पोलिसांकडून कारवाईची मागणी केली आहे.

दिल्ली महिला आयोग म्हणतो, “अलिकडे लहान वयातच मुलांना महिलांसह अश्लिल नृत्यामध्ये सहभागी होण्यास उद्युक्त केले जाते. त्यांना अतिशय बिभत्स नृत्य प्रकार शिकवले जातात.

शिवाय, आई आणि मूल यांच्यातील पवित्र नातेही कलंकित होत आहे. या प्रकारे आईच मुलाला अशी शिकवण देत असेल तर मुलगा भविष्यात महिला आणि मुलींबद्दल काय विचार करेल?

या प्रकारचे किळसवाणे प्रकार सुरू राहिल्यास महिला व मुलीवर होणारे अत्याचार वाढू शकतात. या प्रकारची दिल्ली पोलिसांनी दखल घ्यावी अशी नोटीस पाठवणार असल्याचे महिला आयोगाने म्हटले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये ही महिला आपल्या लहान मुलाच्या गाण्यांवर अश्लील नृत्य करीत आहे. तिने तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर व्हिडिओ हटविण्यात आला. व्हिडिओ तयार करणार्‍याचे इन्स्टाग्रामवर 160,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत.

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाने महिलेविरूद्ध कठोर कारवाई करण्याची आणि मुलाचे समुपदेशन करून योग्य-अयोग्य यात फरक करण्यास सांगितले आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या की, सोशल मीडिया ही एखाद्याची कला दर्शविणारे एक उत्तम व्यासपीठ आहे. परंतु काही लोक फक्त लोकप्रियता मिळविण्यासाठी लज्जास्पद कृत्य करतात.

10-12 वर्षाच्या मुलास चांगले शिक्षण देण्याशिवाय ही महिला केवळ प्रसिद्धीसाठी अश्लील व्हिडिओ बनवित आहे. आम्ही महिला आयोगाच्यावतीने याची दखल घेतली आहे.

महिला आयोग चुकीच्या कृत्याचे महिला असली तरी समर्थन करणार नाही. महिला आयोग या प्रकरणी गंभीर कारवाई करणार असल्याचेही मालीवाल यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here