नागपुरातील चंदू महापूर हत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘लव्ह, शरीरसुख आणि धोका’ असा पुरेपूर मसाल या हत्याकांडात भरलेला आहे.
तीस वर्षीय चंदूचे ज्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, तिनेच चंदूच्या खास आणि बालपणीच्या मित्राला हत्येची सुपारी दिली होती.
त्याहून धक्कादायक बाब म्हणजे चंदूचा मित्र असलेला आरोपी भारत गुजर हा दीड लाख रुपये आणि मित्राच्या प्रेयसीकडून शरीरसुख मिळण्याच्या लालसेतून हत्येसाठी तयार झाला.
मात्र, जेव्हा तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे लावण्याचं ठरवलं तेव्हा तिचे लग्न होऊ नये यासाठी चंदू आडकाठी करू लागला.
यामुळेच नाराज असलेल्या त्याच्या प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांनी चंदूचा काटा काढण्याचा कट केला. त्यासाठी त्यांनी चंदूचा खास मित्र भारत गुजरला हाताशी धरले.
तरुणीच्या कुटुंबीयांनी भारतला दीड लाख रुपये रोख देण्याचे आमिष दिले. मात्र, तो तेवढ्यावरून मित्राची हत्या करण्यास तयार नव्हता. त्यामुळे तरुणीने भारतला गाठून चंदूची हत्या केल्यास भविष्यात शरीर सुखाचे आश्वासन दिले.
दरम्यान, ३० वर्षीय चंदूचे ज्या तरुणीसोबत प्रेम संबंध होते, त्याच तरुणीने चंदूच्या खास आणि बालपणीच्या मित्राला त्याच्या हत्येची सुपारी दिली आणि त्याची निघृण हत्या केली.
धक्कादायक बाब म्हणजे चंदूचा मित्र भारत गुजर फक्त दीड लाख रुपये आणि मित्राच्या प्रेयसीकडून शरीरसुखाचे आश्वासन या लालसेपायी मित्राच्या हत्येसाठी तयार झाला.
२५ फेब्रुवारीच्या दुपारी भारतने चंदूला मद्यपार्टीसाठी नेले आणि संध्याकाळी सालईमेंढा गावाजवळ एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे संधी पाहून त्याने मित्राची हत्या केली.
भारतने वासनेपायी आपल्या मित्राच्या हत्येला होकार दिला आणि २५ फेब्रुवारीला त्याला पार्टी देण्याच्या कारणाने बाहेर नेले. आधी त्याला भरपूर दारू पाजली आणि नंतर नशेत असलेल्या चंदूला एका निर्जन ठिकाणी नेऊन त्याची गळा चिरून हत्या केली.
त्यानंतर भारत गुजरने बालपणीचा मित्र चंदूचा मृतदेह खाणीत फेकून दिला. रात्री उशिरा चंदूचा मृतदेह गावाजवळ निर्जन ठिकाणी आढळल्याने एकाच खळबळ उडाली.
सुरुवातीला पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतरही हत्येचा कोणताच उलगडा होत नव्हता. मात्र २५ फेब्रुवारीला भारतने चंदूला ज्या बारमध्ये दारु पिण्यासाठी नेलं होते.
तिथल्या सीसीटीव्ही कैमऱ्यात दोघे गप्पा मारताना कैद झाले होते. पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरु केला. भारत गुजरची चौकशी केली तेव्हा त्याने हत्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी हत्येच्या या प्रकरणात भारत गुजर, चंदूची कथित प्रेयसी आणि तिच्या आई-वडिलांना अटक केली आहे.
चंदूच्या प्रेयसीकडून शरीर सुखाचे आश्वासन मिळाल्यानंतर वासनेच्या भरात आपल्या मित्राला संपवल्याचा पश्चाताप भारतने पोलिसांकडे बोलून दाखवला आहे.
कॅशवर भागेना, तेव्हा सेक्सची लालसा
चंदूचा खास मित्र भारत गुजरला प्रेयसीने हाताशी धरले. तरुणीच्या कुटुंबीयांनी भारतला दीड लाख रुपये रोख देण्याचे आमिष दिले.
मात्र तो तेवढ्यावरून मित्राची हत्या करण्यास तयार नव्हता. त्यामुळे तरुणीने भारतला गाठलं. चंदूची हत्या केल्यास भविष्यात मी तुला शरीरसुख देईन, असे आश्वासन तिने दिले.