अनैतिक संबंधात अडथळा | पत्नीने दिरासोबत मिळून केली पतीची हत्या, दिरासोबत जे केले ते ऐकून धक्का बसेल!

946

अनैतिक संबंध कितीही एकमेकाला हवेहवेसे वाटले तरी त्याला सामाजिक मान्यता मिळत नाही. त्यामुळे ही नाती एकमेकांना बोचू लागतात व त्यातून जे घडते ते खूप भयंकर असते.

मध्य प्रदेशमध्ये एका महिलेचे दिरासोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधात पतीचा अडथळा होत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी त्यातून त्या दोघांनी मिळून पतीची हत्या केली. त्यानंतर ते दोघे एकत्र राहू लागले.

मात्र ही महिला दिरालाही कंटाळली होती. सतत दिराच्या जाचक संबंध बोचू लागले होते. तेव्हा तिने दिराचा काटा काढण्यासाठी स्वतःच्या मुलाची मदत घेत चक्क दिराचाही काटा काढला.

मात्र यावेळेचा तिचा गुन्हा मात्र लपला नाही. दिराच्या हत्ये प्रकरणी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिने पाच वर्षांपूर्वी पतीचीही हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला.

मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात ही घटना घडली आहे. शहरातील दामखेडा झोपडपट्टीजवळ पोलिसांना मोहन नावाच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. तपासानंतर पोलीस मोहनच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्याची वहिनी राशी घरात होती.

तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता तिने काही उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यावरून पोलिसांना तिच्यावरचा संशय बळावला. त्यांनी तिला चौकसीसाठी ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत सुरुवातीला राशीने तिला यातले काहीच माहित नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने तोंड उघडले व तिनेच मोहनची हत्या केल्याचे कबूल केले.

पोलिस तपासात तिने व मोहनने मिळून पाच वर्षांपूर्वी राशीच्या पतीची देखील हत्या केली होती व त्याचा मृतदेह घरातच एका खोलीत पुरला होता. त्यानंतर पोलिसांनी घरातून तिच्या पतीचा सांगाडा बाहेर काढून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here