सोशल मीडियावर तरुणीचे ‘आक्षेपार्ह’ फोटो व्हायरल | खाजगी क्षणाचे फोटो पाहून तरुणी हादरली !

775
rape

सध्या सोशल मीडियावर अनेक तरुण तरुणींचे खाजगी क्षण व्हायरल होत आहेत. कारण प्रेमात पडल्यावर गुपचूप भेटणारी जोडपी ‘त्या’ खाजगी क्षणाचे कधी संमतीने तर कधी लपूनछपून व्हिडीओ शूट केले जातात.

जर आपल्या मनाप्रमाणे झाले नाही, तरुणीने लग्नास नकार दिला. मुलीने विरोध केला तर प्रेयसीचे अश्लील फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जातात.

अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, तरूणीला सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून जेरबंद केले आहे.

सदरील तरुणाने लग्नास नकार दिल्याने आपण हे कृत्य केले असल्याचे आरोपीचे म्हणणे आहे. प्रेमप्रकरणानंतर लग्नास मुलीने नकार दिल्यानंतर आरोपीने हे कृत्य केल्याचे मुलीचे म्हणणे आहे.

रोहित जालिंदर पाटोळे ( वय 24 राहणार फरिया बाग तालुका नगर ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 17 मे रोजी फिर्याद दाखल केली होती.

रोहित व त्या मुलीचे एकमेकांवर प्रेम होते. काही दिवसापूर्वी ते दोघे बाहेर फिरायला गेले होते. त्या वेळी रोहित याने त्या मुलीचे खाजगी फोटो व व्हिडीओ त्याच्या मोबाईल मध्ये काढले होते.

काही दिवसांपूर्वी त्याने त्या मुलीला लग्नाची मागणी घातली तेव्हा तिने नकार दिला. याचा राग मनात धरून तरुणाने तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

आपल्या प्रेयसीने असा दिलेला नकार रोहितला जिव्हारी लागला आणि त्यामुळे तो संतापला. रोहितने त्या मुलीला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली तसेच त्याने त्या मुलीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून त्यावर मुलीचे अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल केले.

आपले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुलीला या प्रकरणाची कल्पना आली. तात्काळ मुलीने पोलीस स्टेशनला धाव घेऊन गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनील कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीस पुणे परिसरातून अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here