ओला कॅब चालकाने आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेवर केला बलात्कार | सोशल मिडीयावर फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी !

291
rape

पुणे: आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेवर घरी जाण्यासाठी बुक केलेल्या ओला कॅबमध्ये बसल्यानंतर चालकाने तिच्यावर बलात्कार केला.

आपल्या मोबाईलमध्ये तिचे अश्लील फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. 

या प्रकरणात हडपसर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी भागात राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कॅबचालक प्रमोद बाबू कनोजिया (रा. कर्वेनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 4 ते 30 मार्च दरम्यान धायरी परिसरातील एका लॉजमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला आयटी कंपनीत काम करते. तर, आरोपी ओला कॅबवरील ड्रायव्हर आहे. 4 मार्च रोजी महिलेने मांजरीच्या परिसरातून घरी जाण्यासाठी ओला टॅक्सी बुक केली होती.

त्यानुसार आरोपी टॅक्सी घेऊन आला. महिला मांजरी परिसरातून कॅबमध्ये बसली. त्यावेळी बाईला तहान लागली होती. तिने पाण्याची विचारणा केली असता आरोपीने महिलेला अंमली पदार्थ मिसळेले आपल्या जवळ असलेले पाणी दिले.

पाणी पिल्यानंतर ती स्त्री बेशुध्द झाली. त्यानंतर आरोपी तिला धायरी येथील गोकुळ लॉज येथे घेऊन गेला. तिथे त्याने त्या महिलेचे कपडे काढून मोबाईलवरून फोटो काढले. फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देऊन त्याने या महिलेवर अनेकदा बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी महिलेला लॉजमध्ये नेऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here