उदगीर : सध्या देशात व राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. संपूर्ण शासकीय, प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा या संकटाशी निकराने झुंजत आहे.
राज्यात सध्या रक्ताची कमतरता जाणवत आहे. राज्याला मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनानिमित्त व आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी रक्तदान करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यमंत्री संजय बनसोडे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरतभाऊ चामले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश तर्फे राज्यभर चालेल्या ‘मी पण रक्तदान केले’ या मोहिमेत आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उदगीरचे मा.तालुका कार्याध्यक्ष युवराज कांडगिरे यांनी आयोजित नागप्पा अंबरखाने ब्लड बँक मध्ये रक्तदान शिबिर पार पडले.
यावेळी उपस्थित भूषण कानवटे, पंकज केंद्रे, विशाल डोंगरगावे, तिरुपती वसुरकर, कृष्णा दोडके, अभिषेक बारोळे, आदित्य बिरादार, विशाल सोनकांबळे, विशाल मसुरे, विवेकानंद चव्हाण, कृष्णा सुर्यकर व आदि कार्यकर्ते व रक्तदाते उपस्थित होते.
युवराज कांडगिरे राज्यात चालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन केले आहे.