Online Education in Maharashtra | यंदाही राज्यातील शाळा ऑनलाईन माध्यमातूनच सुरू होणार; शिक्षण विभागाची माहिती

625
Online Education in Maharashtra

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्‍या वर्षीही राज्यातील शाळा उद्या (15 जून) पासून ऑनलाईन सुरू होतील. यंदाही राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.

प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या खाली आली असली तरी आजही अनेक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

त्यामुळे सध्या राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रत्यक्षात स्थानिक प्रशासन घेणार असल्याचे शालेय शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

दत्तात्रय जगताप म्हणाले की, “15 जूनपासून आम्ही ऑनलाइन आणि इतर संभाव्य माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्या दृष्टीने तयारी पूर्ण झाली आहे.”

या संदर्भातील एक पत्रक येत्या दोन दिवसांत संबंधित विभागांना देण्यात येईल. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासात खंड पडू नये व व्यत्यय येऊ नये, याची काळजी घेण्यास सांगितले जाईल; असे जगताप म्हणाले.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथिल केले गेले आहेत.

तेव्हा शाळा सुरू करताना एकाच वेळी शाळा सुरू करणे शक्य होणार नाही. जिल्ह्यातील सद्य परिस्थितीच्या आधारे शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनास घेता येईल, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

Online Education in Maharashtra, This year too, schools in state will start online; Education Department Information

हेही वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here