ऑनलाईन लेक्चरमध्ये शिक्षक फक्त टॉवेलरवर शिकवायला यायचा | विद्यार्थिनींनी सोशल मिडीयावर वाचा फोडली !

292

तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांनीने शिक्षकावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. 

याप्रकरणी आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली आहे आणि त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. चेन्नईतील एका शाळेत हा शिक्षक वर्गातील मुलीना त्रास देत होता.

लग्नाच्या वाढदिवसादिवशीचं ब्यूटी पार्लरला जाण्याच्या बहाण्याने पत्नी पळून गेली !

जेव्हा ऑनलाईन वर्ग सुरू व्हायचे तेव्हा हा शिक्षक फक्त टॉवेलवर शिकवायला येत होता. तो शिक्षक बर्‍याच विद्यार्थीनीच्या सोशल मीडियावरील फोटोंवर द्विअर्थी कमेंट करीत होता. अनेक विद्यार्थीनीनी शाळेत तक्रार देखील केली होती, परंतु प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही.

अखेर काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर या प्रकरणाला वाचा फोडत सत्य घटना लोकांसमोर मांडली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पोक्सो अंतर्गत शिक्षकांवर कारवाई केली, त्याला तुरूंगातही पाठवण्यात आले आहे. शाळा प्रशासनानेही आरोपीविरोधात कारवाई करून त्याला काढून टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here