कानपूर पोलिसांनी रॅकेटचा मुखिया दीपक सिंह, त्याची सासू आणि एका तरुणीला अटक केली आहे.
देशात अनेक ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन वेश्याव्यवसाय करण्याचे प्रकार हल्ले खूप जास्त प्रमाणात वाढत आहेत.
अनेक ठिकाणी असले उद्योग उघडकीस येत असून उत्तर प्रदेशात कानपुर इथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आता आहे.
कानपूर पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलीसच ग्राहक बनून गेल्याने ह्या आरोपीस रंगेहाथ पकडण्यात यश आले असून रॅकेट चालविणारा स्वत:च्या पत्नीलादेखील ग्राहकांकडे पाठवत होता.
सविस्तर वृत्त असे कि, इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय सुरु असल्याची तक्रार तक्रार अंशू सिंह नावाच्या एका व्यक्तीने कानपूर पोलिसांच्या ट्विटरवर केली होती.
यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी या ट्विटवर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. चकेरी ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. शिवकरटरा रो़डवर हा सर्व प्रकार सुरु होता.
गेल्या तीन वर्षांपासून दीपक सिंह याची टोळी परिसरात सक्रीय होती. मुख्य आरोपी दीपक सिंह हा कोलकाताचा आहे. त्याने आंतरधर्मिय विवाह केला होता.
तो त्याची पत्नी आणि सासूसोबत कानपूरमध्ये राहत होता. ग्राहकांचे चोचले पुरवण्यासाठी तो पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथून मुलींना बोलवत होता.
पोलिसांना ऑनलाईन सेक्स रॅकेट सुरु असल्याचा माहिती मिळताच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांच्या एका हवालदाराने व्हाट्सएप्पवरून ग्राहक बनून कॉल केला होता.
यानंतर सेक्स रॅकेट चालविणाऱ्या व्यक्तीने काही मुलींचे फोटो त्या पोलिसाला पाठवून दिले. पोलिसांनी यानंतर सापळा रचत मुख्य आरोपी दीपक सिंह आणि दोन महिलांना ताब्यात घेतले.
दीपक सिंह याच्या फ्लॅटवर काही आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या आहेत. चौकशीमध्ये मुख्य आरोपी त्याच्या पत्नीलाही ग्राहकांकडे पाठवत होता व दीपक ग्राहक सांगतील त्या पत्त्यावर ह्या मुलींना पाठवत होता.
जर दीपकच्या फ्लॅटवर ग्राहक आला तर एक चार्ज असायचा मात्र जर मुलींना ग्राहकांच्या पत्त्यावर पाठवायचे असेल तर दीपक त्यासाठी वेगळा दर आकारात होता असे देखील उघड झाले आहे .
पकडलेली तरुणी कोलकाता येथील राहणारी असून चौकशीत तिने पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील मुलींना 15 दिवस किंवा एका आठवड्यासाठी कमीशनवर बोलावले जायचे.
मात्र पोलिसांची रेड पडण्याआधीच त्याची पत्नी फरार झाली. मात्र एका दीपक सिंहच्या फ्लॅटवरून एका कॉलगर्ललही पकडले आहे.