मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून फक्त एकाला संधी मिळणार? कोणाची संधी हुकणार?

908
Naredra Modi

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही.

सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 53 सहकारी आहेत. यातील काही ज्येष्ठ मंत्र्यांकडे दोन मंत्रालयांची जबाबदारी आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

यानंतर कॅबिनेट सदस्यांची संख्या ८१ वर जाईल. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात 28 नवीन लोकांना संधी मिळेल. पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होत आहेत.

भाजपचे सहयोगी असलेल्या अनुप्रिया पटेल यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. २०१४ पासून अपना दल उत्तर प्रदेशात भाजपाचा मित्रपक्ष आहे. 2014 मध्ये पटेल यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले.

याशिवाय उत्तर प्रदेशचे खासदार वरुण गांधी आणि रीटा बहुगुणा जोशी यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या नेत्यांनाही मोदी मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मंत्रीपद जवळजवळ निश्चित मानले जाते.

त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या वर्षी मध्य प्रदेशात भाजपा सत्तेत आली. सिंधिया यांच्यामुळे कॉंग्रेसचे सरकार कोसळले आणि पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आली.

त्यामुळे सिंधिया यांना मंत्रीपद मिळू शकेल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनाही केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे.

या पार्श्वभूमीवर राणे यांना मंत्रीपद मिळू शकेल. राणे यांच्यासह छत्रपती उदयनराजे भोसले आणि प्रीतम मुंडे यांच्या नावांवरही चर्चा झाली. पण आता राणेंचा अपवाद वगळता इतर नेत्यांची नावे मागे पडली आहेत.

रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी हे मंत्री असतानाच मरण पावले. याशिवाय शिवसेना आणि अकाली दलाने आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे एकूण चार मंत्री पदे रिक्त आहेत.

पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत निवडणुका येताच या राज्यांना मंत्रिमंडळ विस्तारात विशेष महत्त्व दिले जाऊ शकते.

हे देखील वाचा 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here