लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत चालली आहे. वाढत जाणारी रुग्ण संख्या पाहून पुन्हा होईल अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.
सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने रात्री आठ वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या कार्य क्षेत्रात संचार बंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत.
31 मार्च पर्यंत जिल्ह्यातील सर्व सरकारी खाजगी शाळा महाविद्यालय खाजगी कोचिंग क्लासेस व्यवसाय प्रशिक्षण संस्था बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी 22 मार्च पासून लातूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय खाजगी कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
ऑनलाईन शिकवणी वर्ग घेता येतील त्याचप्रमाणे विद्यापीठाने निर्धारित केलेल्या पूर्वनियोजित वार्षिक सहामाही तसेच महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून घेता येईल. या निर्णयाची अंमलबजावणी 22 मार्च पासून करावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.