कोरोना महामारीमुळे देशाची स्थिती खुप गंभीर झाली आहे. लोक भिती आणि निराशेच्या वातावरणात जगत आहेत. कोरोनाच्या दहशतीने सांगेल ते दिसेल ते उपाय करीत आहेत.
या भीतीदायक वातावरणात अनेक तज्ञांच्या विविध प्रकारच्या टिप्स व्हायरल होत आहेत. त्यात अनेक शास्त्रीय तर काही चक्क अशास्त्रीय आहेत. या व्हिडीओ व मेसेजचा धुमाकूळ सुरू आहे.
या दरम्यान अनेक प्रकारचे मेसेज सुद्धा सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहेत. ज्यामध्ये ऑक्सीजन लेव्हल चेक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या जात आहेत.
काही दिवसांपासून असाच एक मेसेज खुप वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ‘ए आणि बी’ नावाचे दोन पॉईंट दिले आहेत आणि सांगितले आहे की, जर तुम्ही ‘ए पासून बी’ पर्यंत आपला श्वास रोखण्यात यशस्वी झाला तर तुम्ही कोरोना फ्री आहात. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी प्रयोग करायला सुरुवात केली आहे.
हा मेसेज पाहून अनेकांनी एकमेकाला फॉरवर्ड करायला सुरुवात केली आहे. अनेक लोक हा मेसेज पाहून श्वास रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, पण खरोखर ही पद्धत योग्य आहे का. या गोष्टीचे उत्तर डॉक्टरांनी नकारात्मक व धोकादायक असल्याचा इशारा दिला आहे.
डॉक्टरांच्या मते, ऑक्सीजन लेव्हल चेक करण्यासाठी वायरल होत असलेली पद्धत बनावट आहे आणि ती ट्राय करणे धोकादायक आहे. डॉक्टरांनी इशारा दिला की, हा मेसेज बनावट आहे. हा प्रयोग अजिबात ट्राय करू नका, हे अजिबात योग्य नाही. याचा फायदा कमी व नुकसान अधिक होण्याचीचं शक्यता अधिक आहे.
कारण फफ्फुसाची कार्यक्षमता व त्याची कार्यपद्धती अशा मेसेजद्वारे मोजता येत नाही. फफ्फुसाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी योगा, प्राणायाम व नियमित व्यायाम आवश्यक असते. तेव्हा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका, असा इशारा दिला आहे.