ऑक्सीजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी मागणी प्रस्ताव तातडीने सादर करावा.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कोविड१९ उपाययोजनांचा घेतला आढावा.
उदगीर येथील विविध कोविड सेंटर्सची पाहणी, संबंधितांना केल्या आवश्यक सूचना.
उदगीर : कोरोना विषाणूचा वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उदगीर येथे ऑक्सीजन लिक्विड टॅंक (OXYGEN LIQUID TANK) येत्या 10 ते 15 दिवसात कार्यान्वित होईल.
तसेच हवेतून ऑक्सीजन तयार करण्याऱ्या ऑक्सीजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी प्रशासनाने मागणी प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावे; असे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
ना.संजय बनसोडे उदगीर आणि जळकोट तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीची आढावा आणि उपाययोजनांबाबत बैठकीप्रसंगी बोलत होते.
यावेळी बैठकीला लातुरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देशमूख, डॉ. संजय ढगे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. हरिदास, नगरपालिका मुख्यधिकारी भारत राठोड आदि उपस्थित होते.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात ऑक्सीजनयुक्त बेडस वाढवण्यासाठीही मी प्रयत्न करीत आहे, त्याच बरोबर आवश्यक औषधांचासाठा उपलब्ध व्हावा यासाठीही शासनाकडे मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
ना.बमसोडे पुढे म्हणाले की; औषध आणि ऑक्सीजनसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे मागणी केली असून त्याबबत पाठपुरावा प्रगतीपथावर आहे. या सोबतच सर्व कोविड कोविड सेंटर्स आणि हॉस्पिटल्स येथे स्वच्छता आणि स्वच्छ पाण्याचे नियोजन असणे आवश्यक आहे.
तत्पूर्वी राज्यमंत्री बनसोडे यांनी उदगीर येथील विविध कोविड सेंटरना भेटी दिल्या. यात शहरातील आनंद नगर येथील अंध विद्यालय, जळकोट रोड येथील जयहिंद पब्लिक स्कुल, कौळखेड रोड येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटरची राज्यमंत्री बनसोडे यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांच्या सोबत आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. या कोविड सेंटरमध्ये चालणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. कोविड सेंटर मधील कोरोना रुग्णांशीही त्यांनी संवाद साधला.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना बेड, ऑक्सिजन उपलब्धता आणि वैद्यकीय विशेषज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना ही त्यांनी यावेळी केल्या आहेत, तसेच रेमडीसीवर सारख्या आवश्यक इंजेक्शन तुटवडा निर्माण होणार नाही त्यासाठीही त्यांनी प्रशासनाला यावेळी सूचना केल्या.