Pandharpur By-Election | पंढरपूर पोटनिवडणुकीत कोणाला किती मते पडली, जाणून घ्या!

370
Pandharpur By-Election | Find out how many votes were cast in Pandharpur by-election!

पंढरपूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अतिशय प्रतिष्ठेच्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान अवताडे यांनी विजय मिळवला आहे.

भाजपाच्या समाधान अवताडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा तीन हजार 247 मतांनी पराभव केला. 

मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडेंनी 450 मतांनी आघाडी घेतली होती.

पहिल्या फेरीत अवताडेंना 2 हजार 844 तर भालकेंना 2 हजार 494 मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी 500 हून आधिक मतांची आघाडी मिळवली.

दुसऱ्या फेरीत भालकेंना 3 हजार 112 तर अवताडेंना 2 हजार 648 मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी 635 मतांची आघाडी मिळवलीय.

भालकेंना तिसऱ्या फेरीनंतर एकूण 8 हजार 613 मतं मिळाली आहेत तर आवताडेंना 7 हजार 978 मतं मिळाली आहेत. सातव्या फेरीपासून मात्र अवताडेंनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 19 उमेदवार रिंगणात होते. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आकडेवारीनुसार काही उमेदवारांना पडलेली मते खालील प्रमाणे.

  • समाधान आवताडे (भाजप) – 109450 मते
  • भगीरथ भालके (राष्ट्रवादी) –  105717 मते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here