डॉक्टर महिलेच्या नावाचा वापर करून अनेकांची फसवणूक करणारा तोतया अटक

160
Parrot arrested for defrauding many by using fake doctor's name

मोबाईल SIM CARD रिचार्ज न केल्याने सिमकार्ड बंद पडले. ते सिमकार्ड कंपनीने नव्याने सुरु करून त्याची विक्री केली. अज्ञात व्यक्तीने ते सिमकार्ड खरेदी केले.

त्यानंतर ते सिमकार्ड पूर्वी वापरत असलेल्या डॉक्टर महिलेच्या नावाचा आणि फोटोचा वापर करून महिलेच्या ओळखीच्या लोकांकडून पैशांची मागणी करून पैसे घेतले. ही फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

विश्वनाथ उर्फ शुभम उर्फ हितेश राजकुमार हावा (वय 19, रा. तळेगाव (दे), ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फसवणुकीचा प्रकार 12 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत चिखली परिसरात घडला.

फिर्यादी डॉक्टर चितळे यांच्याकडे 8482902877 हा क्रमांक होता. मागील आठ ते दहा वर्षांपासून तो मोबाईल क्रमांक त्या वापरत होत्या.

त्यावर त्यांनी सहा महिन्यांपासून रिचार्ज केला नाही. त्यामुळे तो नंबर बंद झाला. कंपनीने तो नंबर पुन्हा सुरु करून त्याची विक्री केली.

तो नंबर आरोपी विश्वनाथ याने खरेदी केला. 8482902877 नंबर वरून आरोपीने डॉ. चितळे यांचा फोटो आणि नाव वापरून त्यांच्या ओळखीच्या लोकांना व्हाटसअप द्वारे संपर्क केला.

ओळखीच्या लोकांना वेगवेगळी कारणे देऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. ते पैसे आरोपीने 9168640152 या क्रमांकावर गुगल पे द्वारे पाठवण्यास सांगितले.

काही जणांकडून त्याने तब्बल ५६ हजार रुपये गुगल पेद्वारे स्विकारले. याबाबत डॉ. उत्कर्षा चितळे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चिखली पोलिसांनी आरोपीचा तांत्रिक विश्लेषण करून शोध घेतला. पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणात आरोपी विश्वनाथ याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार त्याचा शोध घेऊन त्याला रहाटणी, काळेवाडी परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने डॉ. चितळे यांच्या संपर्कातील व्यक्तींकडून 56 हजार रुपये घेतल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, उपनिरीक्षक विठ्ठल बढे आणि चिखली गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिसांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here