लातूरमध्ये मोराचा मृत्यू, पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून तपासणी

191

लातूरमध्ये एका शेतात मोराचा मृतदेह आढळल आहे. सध्या देशात अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. तसेच अनेक ठिकाणी बर्ड फ्लू असल्याचे समोर आले आहे. 

या पार्श्वभुमीवर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली आहे. अहमदपुर तालुक्यातील कुमठा बु येथील शिवारात  दुपारच्या सुमारास मोराचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

येथील शेतकरी संजय उजेडे हे आपल्या शेतात दुपारच्या सुमारास गेले असता तुरीच्या ओळीला मोर मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले.

या  बाबतची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भागवत नामवाड व वन विभागास  दिली.  मोर मृत्युमुखी पडल्याची बातमी गावात पसरताच गावात  भिती चे वातावरण पसरले होते.
आपल्या ही  गावात बर्ड फ्ल्यू तर आला की काय? अशी शंका उपस्थित केली जात होती. मुत्युमुखी पडलेल्या मोराचे शवविच्छेदन करण्यात आले. यासाठी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.एम.एम. पठाण उपस्थित झाले होते.
याकामी डॉ.व्ही.एम. मेश्राम, डॉ.नामवाड,बेग, शिवाजी कांबळे यांनी मदत केली . डॉ.पठाण म्हणाले की, मोर हा जखमी झालेला असावा त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here