Pfizer Corona Vaccine 95 टक्के प्रभावी | कोरोनावरील Pfizer च्या लसीला परवानगी

235

Pfizer ची लस आता पुढच्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना मिळणार आहे.

लंडन : जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं 6.4 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 16 लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत तर 59 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनावर लस शोधण्याचं काम युध्दपातळीवर केलं जात आहे. अनेक लसी या अंतिम टप्प्यात असून त्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे ब्रिटनने Pfizer-BioNTech लसीच्या वापराला मंजुरी देऊन त्यात बाजी मारली आहे.

जगभर कोरोनाचा प्रभाव सातत्यानं वाढत आहे. त्याच्या संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. अशा वेळी कोरोनावरची लस कधी उपलब्ध होणार याची सामान्यांना उत्सुकता लागली आहे.

आता ती उस्तुकता संपली असून लवकरच कोरोनाची लस सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ब्रिटनने Pfizer-BioNTech लसीच्या पुढच्या आठवड्यापासून वापराला मंजुरी दिली आहे.

Pfizer ची लस 95 टक्के प्रभावी

ब्रिटनने आपल्या 2 कोटी लोकसंख्येसाठी प्रत्येकी दोन डोस असे 4 कोटी डोसची ऑर्डर केली आहे. यातील 1 कोटी डोस येत्या काहीच दिवसात येणार आहेत आणि बाकीचे डोस त्यानंतर येतील अशी माहिती ब्रिटनच्या प्रशासनानं दिली आहे.

ब्रिटनमध्ये मंजुरी मिळालेली लस ही 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं जातंय. या लसीचा वापर सर्वप्रथम उच्च प्राथमिकता असलेल्या लोकांवर आणि रुग्णांवर केला जाणार असल्याचं ब्रिटनच्या प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here