तरुणीच्या इच्छेविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, आरोपीला अटक

374

पिंपरी चिंचवड : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून बलात्कार करून फसवणूक केली.

याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आले आहे. देहूगाव, लोणी काळभोर, तळेगाव येथे १२ मे २०१५ ते २८ नोव्हेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडला.याप्रकरणी देहूरोड पोलीसानी आरोपीला अटक केली आहे.

सुमित सुशांत नाईक (वय २४, रा. माळवाडी, देहूगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.२०) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. दुचाकीवरून घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर बलात्कार करून तिची फसवणूक केली.

पीडित तरुणीने याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here