Plasma Therapy Big News | कोरोना उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळले

258

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आतापर्यंत प्लाझ्मा थेरपीचे उपचार केले जायचे. कोरोना आजारात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपी बाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

प्रौढ कोरोना रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आले आहे. सरकारकडून टास्क फोर्स नियुक्त करण्यात आली आहे, या फोर्सने प्लाझ्मा थेरपीला उपचारांमधून वगळले आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, एम्स दिल्ली आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर कोरोना उपचारासंबंधी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात प्लाझ्मा थेरपी उपचारपद्धतीत परिणामकारक असल्याचे सांगण्यात आलव होते. मात्र, अभ्यासातून प्लाझ्मा थेरपी परिमाणकारक नसल्याचे समोर आले आहे. आयसीएमआर आणि टास्क फोर्सच्या बैठकीत प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्याचा निर्णय घेतला.

आतापर्यंत कोरोनासंबंधी उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी होती. केवळ सुरुवातीच्या टप्यात म्हणजेच लक्षणे दिसल्यानंतर पहिल्या सात दिवसांच्या आत प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जाऊ शकत होता. दरम्यान टास्क फोर्सने आता प्लाझ्मा थेरपीला उपचारांमधून वगळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here