शेतकरी सन्मान योजनेचा नववा हप्ता आज होणार जमा; १२ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ

369
PM Kisan Samman Nidhi Scheme

शेतकऱ्यांसाठी खूशखबर आज मिळणार PM Kisan चे 2000 रुपये, तुमचे नाव या यादीमध्ये आहे का?

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या नवव्या हप्त्याची (9th Installment of PM Kisan Samman Nidhi Scheme) वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

आज दि. 9 ऑगस्ट रोजी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

या योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.

केंद्र सरकार पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये पाठवते.

आतापर्यंत या योजनेचे आठ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे या योजनेचे व सरकारचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.

अनेक पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारीही करण्यात येत आहेत.

आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे शेतकऱ्यांनी ऑनलाइन तपासून पाहावे, असे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.

असे तपासा आपले नाव

  • सर्वप्रथम पीएम-किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
  • होमपेजवर दिसणाऱ्या Farmers Corner या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर Beneficiaries List या पर्यायावर क्लिक करा
    आता ड्रॉप डाउन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक अशा क्रमाने जाऊन शेवटी गाव निवडा
  • त्यानंतर Get Report वर क्लिक करा.
  • लाभार्थ्यांची संपूर्ण यादी उघडेल. त्यात स्वत:चे नाव आहे का, हे तपासून घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here