PM-Kisan Scheme: शेतकऱ्यांना मोफत मिळणार 36,000 रुपयांच्या योजनेचा लाभ, अशी करा नोंदणी

250

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) देशामध्ये 11.5 कोटी ग्राहकांची नोंदणी करण्यात आली आहे.

तुमचंही नाव यामध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

36 हजार रुपये पेन्शन असणाऱ्या मोदी सरकारच्या या योजनेचा तुम्ही दरवर्षी लाभ घेऊ शकता.

इतकेच नाही तर सरकार यासाठी तुम्हाला कुठलीही कागदपत्रं विचारणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृद्धकाळात ही योजना सगळ्यात महत्त्वाची आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून पंतप्रधान-किसान योजनेतून मिळालेल्या 6000 रुपयांपैकी या योजनेसाठी थेट पैसे वजा केले जातील. शेतक्याला त्याच्या खिशातून खर्च करावा लागणार नाही.

शेतकरी पेन्शन योजनेमध्ये 1 जानेवारी 2021 पर्यंत 21,10,207 नागरिक (PMKMY-Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana) नोंदणीकृत करण्यात आले आहेत.

ज्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेतून प्रीमियम (Premium) वजा केला जातो. हा पेन्शन फंडाची काळजी घेण्यासाठी भारतीय आयुर्विमा (LIC) महामंडळाला नेमण्यात आलं आहे.

काय आहे मानधन योजना ?

या पेन्शन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 5 कोटी शेतकर्‍यांना वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन देण्यात येईल.

PMKMY योनजेअंतर्गत 12 कोटी अल्पभूधारक आणि सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

काय आहेत योजनेची खास वैशिष्ट्ये?

– या योजनेमध्ये किमान प्रीमियम 55 ते 200 रुपयांपर्यंत आहे.

– जर पॉलिसीधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के (1500 रुपये) रक्कम मिळेल.

– जेवढा प्रिमियम शेतकरी भरेल तेवढा मोदी सरकारही देईल.

– जर तुम्हाला ही पॉलिसी सोडायची असेल तर त्यामध्ये जमा केलेले पैसे आणि त्याचं व्याज तुम्हाला मिळेल.

– या योजनेत नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही.

नोंदणी करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी

– या योजनेचा लाभ घेण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) इथं नोंदणी करणं महत्त्वाचं आहे.

– यासाठी आधार कार्ड महत्वाचं आहे.

– 2 फोटो आणि बँक पासबुकसुद्धा आवश्यक असणार आहे.

– नोंदणी दरम्यान किसान पेन्शन युनिक क्रमांक आणि पेन्शन कार्ड तयार केलं जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here