प्रेयसीसाठी पत्नीला पेटविणार्‍या पोलिस प्रेमी जोडप्यावर गुन्हा दाखल

376
प्रेयसीसाठी पत्नीला पेटविणार्‍या पोलिस प्रेमी जोडप्यावर गुन्हा दाखल

सोलापूर : पती व पत्नीच्या नात्यात ‘तिचा’ प्रवेश झाला की सुखी संसार विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा संसार विस्कळीत होतो तेव्हा तिघांपैकी एकाचा बळी जाणे निश्चित होते. त्यातून भयंकर ‘गुन्हा’ घडतो. तेव्हा डोळे उघडून उपयोग नसतो.

अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे की, पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय बन्ने याने पत्नी प्रीती दत्तात्रय बन्ने (रा. शुभम कॉम्प्लेक्स, विष्णूपुरी, जुळे सोलापूर) हिच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा तसेच गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे दुसर्‍या विवाहासाठी त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पत्नी प्रीती हिच्या तक्रारीवरून दत्तात्रय बन्ने व त्याची पोलिस दलातीलचं प्रेयसी दीपाली गवसाने या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी दत्तात्रय बन्ने याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, तिचा विवाह सन 2003 मध्ये दत्तात्रय बन्ने याच्याबरोबर झाला होता. त्यांना त्यांना दोन मुले आहेत.

दत्ता व प्रीती यांचा विवाहानंतर संसार व्यवस्थित सुरू होता; पण त्यानंतर अचानक सन 2010 पासून दत्तात्रय बन्ने याचे महिला पोलिस कॉन्स्टेबल दीपाली गवसाने हिच्या बरोबर प्रेमसंबंध सुरू झाले. ते दोघे एकमेकांशी नेहमी फोनवर बोलत होते.

तेव्हा प्रीतीने दत्तात्रय व दीपाली यांना समजावून सांगितले; पण त्या दोघांनीही त्याला दाद दिली नाही. उलट प्रेमप्रकरण सुरूच राहिले. दिपाली गवसाने हिला दत्तात्रय बन्ने याच्यापासून एक मुलगीही झाल्याचे समजते.

दरम्यान, नोव्हेंबर 2020 मध्ये दत्तात्रय बन्ने हे आजारी पडले होते. त्यावेळी चार दिवस ते घरीच होते. या काळात दत्तात्रय याने दीपाली गवसाने हिचा फोन सुध्दा उचलला नाही. तेव्हा दीपाली ही प्रिती बन्नेे यांच्या घरी आली व तिने प्रिती यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

ज्या-ज्या वेळी दत्तात्रय हा गवसाने हिला भेटून घरी यायचा त्या-त्या वेळी घरी आल्यावर दत्तात्रय हा पत्नी प्रिती हिला शिवीगाळ करून मारहाण करायचा. तसेच माझे दीपालीवर प्रेम आहे. मी तिच्या सोबत राहणार आहे असे उघडपणे मुलांसमोर ओरडून सांगायचा.

प्रीतीने दि.12 एप्रिल रोजी दत्तात्रयच्या मोबाईलमधील फोटो डिलीट केले. तेव्हा प्रिती व दत्तात्रय यांच्यामध्ये कडाक्यायचभांडण झाले. त्यावेळी प्रितीने भांडण वाढू नये यासाठी मुलांना घेवून घराबाहेर गेली. तेव्हा दत्तात्रय याने मुलगा विजय याच्या मोबाईलवर फोन करून प्रितीला शिवीगाळ केली.

त्यानंतर प्रिती सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास प्रिती या मुलासह घरी आली. तेव्हा दत्तात्रय याने प्रितीला मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच अंगावरचे कपडे फाडले व गळा दाबला.

त्यावेळी प्रितीने स्वत:ची सुटका करून किचन मध्ये गेल्या. तेव्हा दत्तात्रय हा किचनमध्ये आला व पेट्रोल प्रितीच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले. अचानक झालेल्या या हल्ल्यात कपडे पेटून प्रिती भाजल्या.

तेव्हा प्रितीचे सासरे हे सोडविण्यासाठी आले असता दत्तात्रय त्यांना किचनमध्ये येवू दिले नाही. यात प्रिती यांच्या उजव्या बाजूला छातीवर वर जखम झाली. त्यानंतर दत्तात्रय हा प्रिती हिला बेडरूममध्ये कोंडून निघून गेला.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी (दि.13 एप्रिल) प्रितीला जास्त त्रास होवू लागल्याने तिने दत्तात्रय याला दवाखान्यात घेवून जाण्याची विनंती केली, पण त्याने तिला दवाखान्यात नेले नाही.

अखेर दुपारच्या वेळी पतीला झोप लागल्यानंतर त्याचा फोन घेवून प्रितीने तिच्या आईला फोन करून घटना सांगितली. त्यानंतर आई आल्यानंतर प्रितीची सुटका झाली.

आई व भावाने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व ही घटना उघडकीस आली. तिच्यावर सिव्हिलमध्ये उपचार करण्यात आकले.

दरम्यान, प्रितीच्या जबाबानंतर प्रिती हिचा छळ करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दत्तात्रय बन्ने व दीपाली गवसाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी दत्तात्रय बन्ने याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात उभे केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. पुढील तपास फौजदार बालाजी हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here