पुणे : पुण्यातील पुजा चव्हाण नावाच्या 22 वर्षीय युवतीने रविवारी आत्महत्या केली होती.
या प्रकरणात सरकार मधील मंत्री ‘सामील’ असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
या प्रकरणात भाजपाने चौकशी करण्याची मागणी करून राजकीय वातावरण तापविले आहे.
या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू असली, असली तरी उघड कोणी आरोप केला नाही.
पुजा चव्हाण आत्महत्येशी विदर्भातील शिवसेनेच्या एका मंत्र्याचं आडवळणाने नाव घेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारवर निशाणा साधला आहे.
तरुणीच्या पालकांनी मात्र कोणाविरुद्धही तक्रार दिलेली नाही. मात्र या तरुणीचं फेसबुक प्रोफाईल पाहिल्यानंतर संबंधित मंत्री आणि ती तरुणी हे एकमेकांना चांगले ओळखत असावेत, असं दिसून येतं आहे.
2018 च्या सुरूवातीला हा मंत्री आणि संबंधित तरुणीचा परिचय झाल्याचं दिसून येत आहे.
पुजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली.
चार दिवसांनंतर देखील या आत्महत्येचं गूढ कायम आहे. सरकार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही भाजपाकडून करण्यात येत आहे.