Politics News | भाजपाच्या ‘नेत्याची’ काँग्रेसने केली सरचिटणीसपदी निवड

202

भोपाळ : मध्यप्रदेशचे राजकारण आश्चर्यकारक आहे, आणि सर्व पक्षात तर कॉंग्रेस पक्ष आणखी आश्चर्यकारक आहे.

यावर्षी सत्ता गमावलेल्या कॉंग्रेसच्या युथ विंगची अवस्था इतकी बिकट आहे की त्यांना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची पूर्ण माहितीही नाही.

काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश युवा कॉंग्रेसने पक्ष सोडलेला आणि भाजपमध्ये गेलेल्या पदाधिकाऱ्याची पुन्हा नेमणूक केली आहे.

पक्षाने जारी केलेल्या पदाधिऱ्यांच्या यादीतही त्यांचे नाव समाविष्ट आहे. मध्य प्रदेशमध्ये युवक काँग्रेसकडून चक्क भाजप नेत्याची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पक्ष सोडून भाजपात प्रवेश केलेल्या नेत्याची युवक काँग्रेसने सरचिटणीसपदी निवड केल्यानंतर युवक काँग्रेसला टीकेला सामोरे जाव लागत आहे.

शुक्रवारी भाजप नेता हर्षित सिंघई यांना अचानक शुभेच्छांचे मेसेज, फोन येऊ लागले. त्यावेळी त्यांना आपली निवड युवक काँग्रेसकमध्ये सरचिटणीसपदी निवड झाल्याचे समजले.

त्यांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला. कारण मार्च महिन्यातच त्यांनी ज्योदिरादित्य शिंदे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका शुक्रवारी संपल्या आणि यावेळी हर्षित सिंघल यांची १२ मतांनी निवड करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर बोलताना हर्षित सिंघई म्हणाले, सर्वात मजेशीर बाब म्हणजे या निवडणुकीत कोणालाच रस नव्हता, तरी देखील माझी सरचिटणीपदी निवड करण्यात आली.

खरतंर मी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबतच १० मार्चलाच पक्ष सोडला. तीन वर्षांपूर्वी मी युथ काँग्रेस निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दिला होता.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर या निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यात येत होत्या. पक्ष सोडला तरीही काँग्रेसच्या रेकॉर्डमध्ये मात्र काहीच अपडेट केलेल नाही याचे चित्र समोर आले आहे.

तसेच, सिंघई यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेसवर निशाणा साधला. जेव्हा मी शिंदे यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला तेव्हा काँग्रेसला माझे नाव निवडणुकीतून वगळण्याची विनंती केली होती. पण त्यांनी तसे काही केले नाही.

मी परत फोन केला तेव्हा त्यांनी ईमेल करत पक्ष सोडण्याची कारणे देण्यास सांगितले. युथ काँग्रेस संपूर्ण मध्य प्रदेशात हेच करत आहे. जे पक्षात नाहीत त्यांनी निवडून आणत आहे, अशी टीका हर्षित सिंघल यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here