पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट | मृत्यू नेमका कशाने झाला?

236

पुणे : राज्यातील राजकारण पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे चांगलेच तापलं आहे. 

या प्रकरणात महाविकास आघाडीतील सरकारमधील एका मंत्र्यांचे नाव चर्चेत आल्यानंतर सगळ्याचे कान घटनेच्या घडामोडींकडे लागल्याचे दिसत आहे. 

हा विषय राजकीय वर्तुळात ज्वलंत बनत असल्याचे चित्र असून, या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी भाजपकडून होत आहे. त्यातच आता पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून, तिचा मृत्यू कशामुळे झाला? याच कारण समोर आले आहे.

पुणे पोलिसांनी पूजा चव्हाणच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दल महत्त्वाची माहिती दिली. वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी बोलवून घेतले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची दीपक लगड यांच्याकडून हेमंत नगराळे यांनी सविस्तर माहिती घेतली.

डोक्याला मार लागून पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू झाल्याचा उल्लेख पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असल्याचे दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना सांगितले आहे.

याप्रकरणी त्यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले. ७ फेब्रुवारीला पूजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केली होती. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत ती राहत होती. पण तिने ७ फेब्रुवारीला तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.

७ फेब्रुवारी रोजी पुण्यात मूळची बीड जिल्ह्यातील असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. भावासोबत पुण्यात स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती राहत होती. तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून तिने आत्महत्या केली.

यानंतर राज्यातील एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात समोर आले आहे. या मंत्र्यांच्या नावाचाही उल्लेख भाजपकडून करण्यात आला असून, भाजपकडून राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाच्या ११ ऑडिओ क्लिप्सही व्हायरल झालेल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांने दखल घेतल्यानंतर चक्रे फिरली?

पूजा चव्हाण प्रकरणात विरोधी पक्षाने ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली होती.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची कालच संपूर्ण माहिती घेतली होती. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांना याप्रकरणाची माहिती दिली होती.

त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली असून मुख्यमंत्र्यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतल्याने ज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नेमकं प्रकरणं काय?

पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.

यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.

भाजपकडून थेट वन मंत्र्याचं नाव

भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं या प्रकरणात नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.

फडणवीसांचं पोलीस महासंचालकांना पत्रं

पूजाच्या आत्महत्येनंतर कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला असून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here