Pooja Chavan Suicide Case | भाजपा नेत्यांविरोधात राठोड यांची पोलीस ठाण्यात तक्रार

201

मानोरा : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तपास सुरू असताना भाजपचे काही लोक विनाकारण राजकीय स्वार्थासाठी बंजारा समाजाची बदनामी करीत आहेत.

तेव्हा या राजकीय हेतूने प्रेरित लोकांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम सरदार राठोड (रा. गुंडी) यांनी दि.१ मार्च रोजी मानोरा पोलीस स्टेशनला दिली.

याप्रकरणी पोलिसांनी तक्रार तपासात ठेवली असून, वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे, असे मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिशिर मानकर यांनी सांगितले.

मानोरा पोलिसांत १ मार्च रोजी दाखल केलेल्या तक्रारीत राठोड यांनी नमूद केले की, पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या मुलीने आत्महत्या केली, ही बाब खेदाची असून त्याचे आम्हालाही दु:ख आहे.

यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे; मात्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड, अतुल भातखळकर, आशिष शेलार आदी लोक बंजारा समाजाची, पूजा चव्हाणच्या कुटुंबाची बदनामी करून चारित्र्यहनन करीत आहेत.

याशिवाय पोलीस तपासात अडथळा निर्माण केला जात आहे. त्यामुळे संबंधित नेते व मीडियावर कारवाई करावी; अन्यथा राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे आंदोलन करू, असा इशारा तक्रारीत दिला आहे.

वाचा : Pankaja Munde Vs Dhanajay Munde | संजय राठोड यांच्यानंतर धनंजय मुंडे यांचा नंबर लागणार? पंकजा मुंडे यांनीच मागणी

मानोरा पोलिसांनी ही तक्रार तपासात ठेवली असून, वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे, असे ठाणेदार शिशिर मानकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here