पूजा चव्हाण आत्महत्या | मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घ्यावी : फडणवीस

159

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीस दबावात आहेत का? असा प्रश्न निर्माण होतोय, असे म्हटले.

त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे, हे स्पष्ट आहे. पोलिसांनी ते सांगितले पाहिजे. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आलेले नाही.

मुख्यमंत्र्यांनी या संबंधातील नीट माहिती घ्यावी म्हणजे कुणाचं आयुष्य उद्धवस्त झाले ते त्यांना कळेल, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांची कारवाई दबावात होत असल्याचे स्पष्ट दिसते. पोलीस जोपर्यंत कारवाई करत नाहीत तोपर्यंत त्यांना खुलं मैदान आहे. पोलिसांवरील दबाव नाहिसा झाला पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घ्यावी मग

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्य ऐकून त्यांनी या प्रकरणाची माहिती नीट घेतली नसल्याचं वाटते. उद्धव ठाकरेंना गांभीर्य लक्षात आलेलं नाही, त्यांनी याप्रकरणाला गांभीर्यानं घेतलेले दिसत नाही.

त्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी, क्लीप्स नीट ऐकाव्या यावरून कुणाचं आयुष्य उद्धवस्त झाले ते कळेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पूजा चव्हाणची आत्महत्या मंत्र्यामुळे?

पूजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली आहे. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली आहे.

पूजा चव्हाणनं विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा होती. त्याची चौकशी करा म्हणून भाजपच्या पुण्यातल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी आयुक्तांना निवेदनही दिले आहे.

या प्रकरणातील मंत्र्याचे नाव आतापर्यंत कुठेही समोर आलेले नव्हते. ना ते तक्रारीत आहे ना, कुठे एफआयआरमध्ये. पण आता भाजपकडून त्या मंत्र्याचे नाव समोर आणले  जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here