पुणेः पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनं पुण्यात खळबळ उडाली आहे. या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणात आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचं नाव असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.
यावर पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रेमसंबंधातून पुण्यातील तरुणीने आत्महत्या केल्याचे आरोप करण्यात येत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला.
अजित पवारांनी थेट उत्तर दिले कि, ‘आत्महत्या झाल्यानंतर त्याची चौकशी पोलीस करत असतातच. या प्रकरणातही चौकशी होईल. चौकशीनंतर सत्य बाहेर येईलच,’ असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, ‘आता काही पक्षांना दुसरं काही काम नसल्यानं असे आरोप कराताहेत,’ असा टोलाही विरोधी पक्षाला हाणला आहे.
‘मुंबईतही धनंजय मुंडे यांच्याविरुद्धही आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात संबंधित महिलेने तक्रार मागे घेतली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता तक्रार मागे घेतल्याचे संबंधित महिलेने सांगितले आहे,’ असेही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आरोप केला, तेव्हा त्यावेळेस त्यांना मुद्दामहून आरोप करायला भाग पाडले होते का?, असे बरेच काही त्याच्यातून प्रश्न निर्माण होऊ शकतात.
धनंजय मुंडेंचं प्रकरण आता मिटलं आहे. पण पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलीस विभागाकडून चौकशी सुरू आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चौकशीनंतर काय ते समोर येईल, असंही अजित पवार म्हणाले आहेत.