पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण | दारू प्यायली की दारू पाजली?

217

मुंबई : पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणाला अता नवं वळण लागलं आहे. पूजा चव्हाण हिने दारु पिल्याचा जबाब तिच्यासोबत राहणा-या तिच्या भावानं आणि त्याच्या मित्रानं पोलिसांना दिला आहे. 

त्यामुळे पूजा दारु प्यायली की तिला दारु पाजण्यात आली असाही प्रश्न उपस्थीत झाला आहे. पूजाचा मृत्य म्हणजे आत्महत्याच आहे, असे अद्याप नोंदविलेलं नाही असं पोलिसांनीही स्पष्ट केले. 

पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पूजा चव्हाण नावाच्या 22 वर्षांच्या तरुणीच्या आत्महत्येमुळं सध्या एकच खळबळ उडाली आहे. तिनं आत्महत्या का केली? याबाबत विविध तर्क लढवले जात आहेत.

  • पण ही पूजा चव्हाण नेमकी होती तरी कोण? पूजा चव्हाणनं का केली आत्महत्या? नेमकी कोण आहे पूजा चव्हाण? भरपूर पैसा, उत्तम राहणीमान असताना आत्महत्या का?

पूजा चव्हाणचं वय फक्त 22 वर्षे आहे. गेल्या ७ फेब्रुवारीला पुण्याच्या वानवडी भागातल्या इमारतीतून उडी टाकून तिने जीवन संपवलं आहे. तिने आत्महत्या का केली? या तरुणीला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

ही पूजा चव्हाण मूळची कुठली? ती पुण्याला राहायला का आली होती? हे प्रश्नही समोर आलेत. 

पूजा ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी आहे. ती सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह होती. टिक टॉक स्टार म्हणून तीने लोकप्रियता मिळवली होती.

बंजारा समाजाच्या पूजाचा सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात देखील सक्रीय सहभाग होता. माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह शिवसेनेचे यवतमाळचे वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबत तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत.

मूळची बीडची असलेली पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियात बऱ्याच चर्चा सुरू आहेत. पूजा चव्हाण या माझ्या मतदारसंघातील तरुणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. या तरुणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून केली आहे.

वानवडी भागातल्या याच इमारतीत पूजा चव्हाण राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती बीडवरून पुण्याला आली होती. इंग्लिश स्पिकिंगचे क्लासेस करण्यासाठी आपण पुण्याला जातोय, असे तिने तिच्या कुटुंबीयांना सांगितले होते.

तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, अशी माहितीही समजत आहे. मात्र गेल्या ७ फेब्रुवारीच्या रात्री तिनं या इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवले.

डोक्याला आणि मणक्याला ईजा झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here