पूजाचा खून झालाय : पूजाची चुलत आजी शांताताई राठोड आज गुन्हा दाखल करणार?

281
Shantabai Rathod

पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेच्या 18 दिवसानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही. आज पूजा राठोडची चुलत आजी शांताताई राठोड आज गुन्हा दाखल करणार आहेत. 

पुणे पोलीस आयुक्तांची त्या भेट घेणार आहेत. तसेच फिर्यादीत मंत्री संजय राठोड यांचेही नाव टाकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शांताताई राठोड या तृप्ती देसाई यांच्या मदतीने वानवडी पोलिस स्टेशनला जाणार आहेत.

एबीपी माझाशी बोलताना शांताताई म्हणाला की, पोलिसांचं म्हणणं आहे की, पूजाच्या मृत्यूला 18 दिवस झालेले आहेत. पूजाच्या मृत्यू प्रकरणात कुणीही नातेवाईक गुन्हा दाखल करायला आलेले नाहीत.

तेव्हा मी नातेवाईक या नात्यानं आम्ही वानवडी पोलिस ठाण्यात जाणार आहोत. पूजाच्या मृत्यूप्रकरणी कुणीही आरोपी असो मग ते अरुण राठोड, विलास चव्हाण, असो किंवा मंत्री संजय राठोड असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत.

जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोवर मी पुण्यातून बाहेर जाणार नाही, असं पूजाची आजी शांताबाई यांनी सांगितलं. व्यवस्थित चौकशी झाली नसेल तर मी पोलिसांविरोधात देखील गुन्हा दाखल करणार आहे, असंही शांताताई राठोड यांनी सांगितलं.

शांताताई म्हणाल्या की, संजय राठोड, अरुण राठोड, विजय चव्हाण यांच्यावर गुन्हा करणार आहे. विजय म्हणत होता पोस्टमार्टम होऊ देऊ नका, पोस्टमार्टम रिपोर्ट कुठे गेला, फक्त मृत्यू झाला म्हणून नोंद आहे.

कितीही पळवाट काढली तरी काहीही होणार नाही. आता पुढे आले नाहीतर आमच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक नंतर मंत्री संजय राठोड एकच व्यक्ती आहे म्हणून समाज पुढे येत नाही, असंही शांताताईंनी म्हटलं आहे.

त्या म्हणाल्या की, अरुण राठोडला खुप मोठं आमिष दाखवलं आहे. अरुण राठोड हा त्याच्याच घरी आहे, दिवसा बाहेर असतो रात्री घरी येतो. पूजाच्या आई वडिलांनी सत्यासाठी बाहेर यायला हवे. त्यांच्या घरच्यांवर दबाव, त्यांना लेकरांची किंमत नाही. पुजाचा खून झालाय, पूजा डॅशिंग मुलगी होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

पोहरादेवीतील महंत खरे बोलत होते. ते ठिकाण राजकारण करण्याचे नाही. मंत्र्यांना महंत सपोर्ट करत असतील तर चुकीचं आहे. महंत असे करायला लागले तर समाज काय करेल, असंही शांताताई यांनी म्हटलं आहे.

शांताताई म्हणाल्या की, पोलिसांवर दवाब असू शकतो. पोलिस कुणाच्या दबावात आहेत, हे आपण सांगू शकत नाहीत. जोवर कायद्याचा धाक नाही, तोवर हे असंच वातावरण राहिल.

पोलिसांनाही धाक पाहिजे, असे शांताताई यांनी म्हटलं आहे. पोलिस स्टेशनच्या शेजारी एवढी पोलिस घटना घडली तरी साधी चौकशी पोलिसांनी केली नाही. मुलगी वरुन पडून मृत्यू झाला असे सांगितलं.

पूजाच्या आजीचे पोलिसांना सवाल

  • रात्री दोन वाजता ते दोन मुलं कशाला आले?
  • तिला घेऊन ते दोघं दवाखान्यात कसं येऊ शकतात?
  • त्यांच्यासोबत कोण कोण होते?
  • इथं कशामुळं राहत होते?
  • कोणत्या कॉलेजात शिकायला होती?
  • याची चौकशी झाली का?

ही चौकशी झाली नसेल तर मी पोलिसांविरोधातही गुन्हा दाखल करेल, असं शांताताई यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here