नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेकजणांना घरुन काम ‘WORK FROM HOME’ करावं लागत आहे.
विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करावा लागत आहे, त्यामुळे घरी इंटरनेटची स्पीड जास्त असणे आवश्यक आहे.
तेव्हा इंटरनेटचा स्पीड कमी असल्यानं तुमच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्याकडे मोबाईल नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करण्याचा पर्याय राहतो.
कोरोनाच्या काळात तुम्ही घरबसल्या आपला मोबाईल नंबर पोर्ट करु शकता.
रिलायन्स जिओवर मोबाईल क्रमांक पोर्ट करण्याची ऑनलाईन पद्धत
– गूगल प्ले स्टोरवर जाऊन MyJio अॅप डाउनलोड करा
– अॅपमध्ये गेल्यानंतर port सेक्शनमध्ये जा
-तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील: ‘Get a new Jio SIM and keep the existing number’ आणि ‘change the network’.
-प्रीमेड किंवा पोस्टपेडनुसार तुम्ही प्लॅन निवडू शकता
– त्यानंतर आपले लोकेशन कन्फर्म करा
– तुम्हाला दोन ऑपशन दिसतील Doorstep आणि store pickup.
-जर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं नसेल, तर Doorstep ऑप्शन निवडा. आपल्या सुविधेनुसार तारीख आणि वेळ सिलेक्ट करा. तुम्ही नव्या सीमच्या डिलेव्हरीला ट्रॅकही करु शकता.
एअरटेलवर मोबाईल नंबर पोर्ट करण्याची ऑनलाईन पद्धत
– AirtelThanks अॅपला गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा
-त्यानंतर प्लॅन सिलेक्ट करा आणि पोर्ट-इनची रिक्वेस्ट कन्फर्म करा
-त्यानंतर एअरटेल तुम्ही दिलेल्या अॅड्रेसवर एक एक्झिक्युटिव्ह पाठवेल, जेणे करुन तुम्हाला नवीन सीम डिलिव्हर केलं जाईल
वोडाफोन-आयडियावर मोबाईल नंबर पोर्ट करण्याची पद्धत
-वोडाफोन-आयडिया एपवर जाऊन MNP पेजवर आपले नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि शहर एंटर करा
-आपल्या गरजेनुसार Vodafone RED Postpaid प्लॅन निवडा
– ‘Switch to Vodafone’ बटनवर
-फ्री सिम डिलिव्हरी मिळवण्यासाठी आपला अॅड्रेस आणि पिन कोड टाका