सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो पोस्ट करून तिची बदनामी केली. त्यामुळे चार जणांविरूद्ध बदनामी केल्याचा सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी तौसिफ, अरबाज, प्रदीप आणि करण शर्मा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादी मुलीला पहिल्यांदा तिचे अश्लील फोटो पाठविण्यास भाग पाडले.
त्यानंतर ते फोटो सोशल मीडियावरफोटो पोस्ट करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनीच इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडले आणि तिचे अश्लील फोटो अपलोड केले.
मुलीने आपल्या कुटुंबियांना याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत.