बंगालमधील हिंसाचाराच्या विरोधात राष्ट्रपती शासन लागू करावे, यामागणीचे उदगीर भाजपा तर्फे निवेदन
उदगीर : देशात निवडणूक होते, राजकारण निडणूकीपुरते केले जाते. मात्र निवडणूक झाल्यानंतर प्रतिशोध घेतला जात नाही. बंगालमध्ये मात्र निवडणुका झाल्यानंतर टीएमसी सत्ताधारी पक्षाच्या गुंडांकडून भाजपचे कार्यालय जाळणे, बूथ प्रमुखांना मारणे. महिला कार्यकर्त्यांवर अत्याचार केले जात आहेत, हे अतिशय निंदनीय आहे.
सर्व हिंसाचार संविधान व लोकशाहीचा अवमान आहे. तेव्हा या हिंसाचाराला आळा घालून तिथल्या सामान्य जनतेला व कार्यकर्त्यांला संरक्षण देण्यासाठी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली आहे.
बंगाल मध्ये 2 मे नंतर पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्यानंतरही नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यामुळे नाराज असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत.
आरामबाग येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यालय जाळुन टाकले. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चार कार्यकर्ते मृत्युमुखी पडले. अनेक महिला कार्यकर्त्यांवर अत्याचार केले जात आहेत. या परिस्थितीमध्ये पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी (दि.५) उदगीर भारतीय जनता पार्टी तर्फे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, भाजप नेते धर्मपाल नादरगे, उपनगराध्यक्ष सुधीरभाऊ भोसले, उदगीर भाजपा शहराध्यक्ष उदयसिंग ठाकूर, प्रेदेश सदस्या उत्तरा कलबुर्गे, जिल्हा सरचिटणीस श्यामला कारामुंगे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मजगे, नगरसेवक गणेश गायकवाड, शहर सरचिटणीस पप्पू गायकवाड, शहर सरचिटणीस नागेश अष्टुरे, बाळासाहेब पाटोदे, आनंद बुंदे, सभापती मनोज पुदाले, नगरसेवक दत्ता पाटील, रामेश्वर पवार, रमेश शेरीकर, वसंत शिरसे, लाखन कांबळे, संजय शाहीर, इरशाद शेख व अमित धुमाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.