नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज अनेक ठिकाणी वेगवेगळी भाषणे करीत असतात. प्रत्येक वेळी एवढे विषय आणि एवढी माहिती संकलित करून भाषण कोण लिहित असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
कारण पंतप्रधान मोदी विविध भाषणे करत असतात. निवडणुक प्रचारासाठी वेगळे, संसदेतील भाषण वेगळं, ‘मन की बात’ की भाषण वेगळे, रॅलीतील भाषण वेगळे, दिवसांतून दोन दोन-तीन तीन भाषणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना करत असतात.
तेव्हा ही भाषणे नेमकं लिहून कोण देतं? या प्रश्नाच्या उत्तरासाठी एका प्रसारमाध्यमाने सरळ पंतप्रधान कार्यालयात माहिती अधिकाराचा अर्ज म्हणजे आरटीआय अर्ज दाखल केला होता. याचे उत्तर आले आहे, या उत्तरात पंतप्रधान कार्यालयातून आले आहे.
या माहिती अधिकाराच्या अर्जातून भाषण लिहून देणाऱ्या व्यक्ती आणि त्यांना दिले जाणारं मानधान याविषयी माहिती मागविण्यात आली होती. त्या अर्जाचं उत्तर आले आहे. उत्तरात असे म्हटले गेलेय की, ही वेगळी भाषणं पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लिहितात. भाषणाची संहितादेखील त्यांचीच असते, प्रत्येक भाषणाला त्यांच्याकडूनच अंतिम रुप दिले जाते.
उत्तरात पुढं असंही म्हटले गेलेय की, वेगवेगळ्या माध्यमांतून माहिती गोळा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली जाते. त्या माहितीच्या आधारे पंतप्रधान स्वतः भाषण लिहून काढतात.
कोणत्या कार्यक्रमात कोणती माहिती द्यायची आहे, यासंबंधी संबंधित विभागाकडून माहिती गोळा केली जाते. ही गोळा केलेली माहिती पंतप्रधानांना दिली जाते.
त्यानंतर पंतप्रधान स्वतः त्या भाषणाला अंतिम स्वरूप देतात. पंरतु ही भाषणांसाठी किती मानधन दिलं जातं किंवा किती पैसे खर्च होतात, याची माहिती देण्यात आली नाही.