देशात वाढत्या कोरोना संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतीत | भारतात कोरोना नियंत्रणाबाहेर?

226
Naredra Modi

नवी दिल्ली : देशात वाढत्या कोरोना संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी चिंता व्यक्त केली होती. कोरोनाला थोपवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकीकड़े कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे कोरोना लसीकरणावरून केंद्र आणि राज्य सरकारांमधील तक्रारी समोर येत आहेत. 

महाराष्ट्रात गुरूवारी कोरोना संसर्गाचे 56 हजाराहून अधिक नवीन रुग्णांची भर पडली. 24 तासात 376 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याशिवाय कर्नाटकमध्ये 6570, तामिळनाडू 4276, गुजरातमध्ये 4021, पंजाबमध्ये 3119 हरियाणामध्ये 2872 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हटले की, ‘गतवर्षीपेक्षा कोरोनाची जी सर्वोच्च गती होती. ती आताच आपण पार केली आहे. कोरोना संसर्गाचा वृद्धीदर गेल्यावर्षीपेक्षादेखील अधिक आहे. 

महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, मध्यप्रदेश आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये गेल्यावर्षीचा सर्वोच्च संसर्गदर कधीच पार केला आहे’. पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, नागरिक अपेक्षेपेक्षा अधिक बेजबाबदारपणे वागत आहेत. तर अनेक राज्यांमध्ये प्रशासन गांभीर्याने काम करीत नाहीये.

यावर्षी असे अनेक रुग्ण आहेत की ज्यांना कोणतेही लक्षणं नाहीत. प्रशासनाने अतिसक्रियता दाखवून नागरिकांच्या तपासणीचे मोठे प्रयत्न करायला हवे. आपण जेवढे लसीकरण करीत आहोत.

त्यापेक्षा जास्त लक्ष तपासणीकडे असायला हवे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या तपासण्यांना हलक्यात घेऊ नका. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला तपासण्यांची टक्केवारी वाढवावीच लागेल. आणि पॉझिटिव्ह असण्याची टक्केवारी पाच पेक्षा खाली आणावीच लागेल. असे पंतप्रधान मोदी म्हटले आहे.

  • दिल्लीच्या शेजारी असलेल्या उत्तरप्रदेशमधील गौतमनगर आणि गाजियाबादमध्ये कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. भारतात प्रतिदिवस लसीकरण वाढवण्यात येत आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लसीकरण करणारा देश आहे.

लोकसहभागातून अनेक अडचणींना तोंड देऊ शकतो. आधीपेक्षा देशात चांगल्या गुणवत्तेचे संसाधने उपलब्ध आहेत. आरोग्य कर्मचारी देशातील स्थिती सांभाळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत आहेत. असेही मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनानंतर कर्नाटकमधील बंगळूरू आणि इतर 6 जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. आदेशानूसार शनिवारपासून ते 20 एप्रिलपर्यंत कर्फ्यू जारी राहणार आहे.

मुख्यमंत्री बीएस येडूयुरप्पा यांच्या आदेशानुसार राजधानी मैसुर, मंगळूरू, कालाबुरागी, बीदर. तुमकुरू आणि उडुपी-मणिपालमध्येही कर्फ्यू लावण्यात येणार आहे. त्यात अत्यावश्यक सेवा सुरू असतील.

जम्मू काश्मिरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी कोरोना संसर्गाचा प्रचार रोखण्यासाठी जम्मू आणि श्रीनगरसह आठ जिल्ह्यांच्या शहरी परिसरात नाईट कर्फ्यू लावण्याचे आदेश दिले आहेत.

जम्मू काश्मिरमधील नाईट कर्फ्यू आजपासूनच अंमलात येणार आहे. आदेशानुसार जम्मु, उधमपुर, कठुआ, श्रीनगर, बारामुल्ला, बडगाम, अनंतनाग आणि कुपवाडामध्ये हा कर्फ्यू असणार आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी एका आठवड्याचे आगाऊ डोस उपलब्ध करणे आणि कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी उपयुक्त असे औषधं आणि उपकरणांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here