नवी दिल्ली : शुक्रवारी निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये निवडणुकांच्या तारखांची घोषणा जाहीर केली. तसेच आचारसंहितादेखील लागू केली आहे.
याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपाना महत्वाचा आदेश दिला आहे. आयोगाने म्हटलं आहे की, ७२ तासांच्या आतमध्ये पेट्रोल पंपावर असणारे नरेंद्र मोदींचे होर्डिंग्ज हटवा’, असा आदेश आयोगाने दिला आहे.
तृणमूल काॅंग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर आयोगाने हा आदेश दिला आहे. आयोगाने पुढं असं म्हटलं आहे की, “पेट्रोल पंपावर केेंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणाऱ्या होर्डिंग्जवर नरेंद्र मोदींचा फोटो असणं म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन आहे.” तृणमूल काॅंग्रेसने लसीकरण मोहिमेच्या पोस्टर आणि व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोंचा वारपर करण्यावरून आक्षेप नोंदविला होता.
सोमवारी भाजपनेही तृणमूल काॅंग्रेस विरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेत आचारसंहिता लागू झालेली असतानाही प. बंगालमधील दोन मंत्री मतदारांना आकर्षित करण्यालाठी आश्वासन देत असल्याचा आरोप केलेला होता.
भाजपनेही दोन्ही मंत्र्यांना विधानसभा निवडणूक लढण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी केलेली आहे. परंतु, तृणमूल काॅंग्रेसने हे आरोप फेटाळून लागले आहे.