प्रियांका गांधींच्या ताफ्यातील गाड्यांचा एकमेकांना धडकून अपघात

209

नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला झालेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सांत्वना देण्यासाठी निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्या ताफ्यात अपघात झाल्याचे समजते.

गुरुवारी सकाळी प्रियांका गांदी दिल्लीहून उत्तर प्रदेशच्या रामपूरकडे रवाना झाल्या होत्या. याच दरम्यान त्यांच्या ताफ्यातील गाड्या हापुड जिल्ह्याच्या गढमुक्तेश्वरमध्ये राष्ट्रीय महामार्ग – ९ पुलावर पोहचल्यानंतर हा अपघात घडला.

गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानंतर अचानक ब्रेक लावल्यानं प्रियांका गांधी यांच्या ताफ्यात एकामागोमाग चालणाऱ्या दोन – तीन गाड्यांनी एकमेकांना मागून धडक दिली.

Image result for प्रियंका गांधी अक्सिदिंत

सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. प्रियांका गांधी या मात्र सुखरुप आहेत. अपघातग्रस्त गाड्यांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचं समजते.

  • प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील आयकर कार्यालयाजवळ पोलिसांनी लावलेले बॅरिकेडस् ट्रॅक्टरनं तोडताना वेगात असलेला ट्रॅक्टर अचानक पलटी झाला. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या नवरीत सिंह याचा जागीच मृत्यू झाला होता.

२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान आयकर कार्यालयाजवळ ट्रॅक्टर पलटून २७ वर्षीय नवरीत सिंह या तरुणाचा मृत्यू झाला होता.

काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११.३० वाजता नवरीत यांच्या शोकसभेत सहभागी होण्यासाठी प्रियांका गांधी रामपूरला निघाल्या होत्या.

नवरीत सिंह अभ्यासासाठी ऑस्ट्रेलियात गेला होता. नुकताच तो भारतात परतला होता. मात्र, भारतात आल्यानंतर तो दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here