प्रियांका-निकने कोराना विरुद्धच्या लढाईसाठी 22 कोटींचा निधी जमविला !

195
Actress Priyanka Chopra and her husband Nick Jones

जगात अजूनही कोरोनाच्या साथीने सामान्य माणसाचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अनेक देशांमधील सेलिब्रेटी या संकटात मदतीचा हात देत आहेत. कोणी स्वत:चे पैसे देऊन मदत करीत आहे. तर कोणी निधी संकलन करून मदत करीत आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनस यांनी एकूण 22 कोटी रुपये जमा केले आहेत. हा निधी फक्त भारतातील कोरोना विरुद्धच्या लढाईत वापरला जाणार आहे.

प्रियंकाने स्वत: सोशल मीडियावर निधी उभारणीची माहिती शेअर केली. प्रियांका-निक यांनी ‘GIVE INDIA’ नावाची मोहीम राबवून हा निधी जमविला आहे. संपूर्ण निधीचा उपयोग कोरोनाशी लढण्यासाठी, गरजूंना मदत करण्यासाठी वापरला जाईल.

प्रियांकाने अलीकडेच गिव्ह इंडियाच्या सीईओशी चर्चा केली आहे. हा निधी योग्य रितीने कसा व कसा वापरायचा. या बाबत प्रियांकाने सूचना दिल्या आहेत, त्यानुसार लवकरच मदत गरिबांपर्यंत पोहोचणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here