नांदेड : राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची भरती रखडली आहे. मात्र येत्या काळात लवकरच प्राध्यापकांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. (Uday Samant’s big announcement recruitment of professors in the state’)
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षक भरती रखडली आहे. ही भरती लवकर करावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे.
यासाठी अनेक आंदोलनही करण्यात आली. पण याबाबतचा कोणतीही प्रक्रिया झाली नाही. पण नुकतंच उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे.
येत्या काळात लवकरच प्राध्यापकांची भरती करणार असल्याचे वक्तव्य उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सांमत यांनी केलं. मंत्र्यांच्या या घोषणेमुळे अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे.
15 तारखेपासून महाविद्यालये सुरु
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु केली जाणार आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होतील.
याबाबत उदय सामंत यांनी 1 फेब्रुवारी रोजी सर्व कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढवा घेतला होता.
त्यावेळी विद्यापीठातील अभ्यासक्रम, परीक्षेचे नियोजन, वसतीगृह यासंदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) विद्यापीठांनी तयार करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता 15 तारखेपासून महाविद्यालये सुरु होतील.
असे असले तरी कोरोना महामारी लक्षात घेता संबंधित विद्यापीठाचे कुलगुरु आपत्ती व्यवस्थापनशी चर्चा करुन महाविद्यालये सुरु करण्याविषयी निर्णय घेतील, अशी माहिती सामंत यांनी दिली.
तसेच, यावेळी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरु केली जातील अशी माहितीही सामंत यांनी दिली. यावेळी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक असेल, असे सामंत यांनी आवर्जून सांगितले.