-
आमदार विकास निधि अंतर्गत 05 रुग्ण्वाहिकाचे लोकार्पण
-
विकासासाठी निधी कमी पडणार नाही : बनसोडे
उदगीर आणि जळकोट मतदारसंघ माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. या मतदारसंघातील जनतेच्या विकासासोबत आरोग्याची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे.
ग्रामीण भागात एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर तातडीने रुग्णालयात दाखल करता यावे, त्यांचा जीव वाचावा हीच इच्छा आहे.
माझ्या प्रयत्नामुळे एक जीव वाचला तर माझे प्रयत्न सार्थक झाले असे समजेन, असे प्रतिपादन नामदार संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयमध्ये स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत 5 रुग्ण्वाहिकांचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ना.संजय बनसोडे बोलत होते.
या रुग्ण्वाहिका वाढवणा बू.,अतनुर, जळकोट ग्रामीण रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र तळवेस, उदगीर सामान्य रुग्णालय यांच्या सेवेत रुजू करण्यात आले.
यावेळी लातूर जिल्हायाचे जिल्हाधिकारी श्री.पृथ्वीराज बी.पी., CEO अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, राष्ट्रवादीचे नेते बस्वराज पाटील नागराळकर, कल्याणराव पाटील, गजानन सताळकर, चंद्रकांत टेंगाटोल, बाळासाहेब मरलापल्ले यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.