पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात उदगीर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निषेध

298
Protest by Udgir Taluka Congress Committee against petrol, diesel and gas price hike

उदगीर : केंद्र सरकारने खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविली आणि आता सामान्य माणुस वाढत्या महागाईमुळे  देशोधडीला लागला आहे. पेट्रोल,डिझेल आणि गॅस यांचे भाव गगनाला भिडले आहेत. 

बेरोजगारीमुळे तरुण उध्वस्त झाला आहे. लॉकडाऊनच्या नावाने रोजगार हिरावून घेण्यात आला आहे. या सर्वांसाठी केंद्र सरकारचे दिशाहीन धोरण जबाबदार आहे.

केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसदरवाढी विरोधात नांदेड रोड येथील मानकरी पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, कृषि उत्पन्न बाजार समिति सभापति सिद्धेश्वर पाटील, शहराध्यक्ष मंजूरखा पठाण, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापति मधुकरराव एकुर्केकर, तालुका काँग्रेस कमिटी बूथ समन्वयक विजयकुमार चवळे, उदगीर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल कांडगिरे, उदगीर विधानसभा काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अमोल घुमाडे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शशिकांत बनसोडे, पंचायत समिति उपसभापति बाळासाहेब मरलापल्ले, कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक संतोष बिरादार, गौतम पिंपरे, नगरसेवक फैजूखा पठाण, राजकुमार भालेराव, राजकुमार हुडगे, पाशा मिर्झा, विलास शिंदे, विनोबा पाटील, ज्ञानोबा गोडभरले, धनाजी मुळे, बालिकाताई मुळे, विकास सहकारी साखर कारखाना संचालक नाना ढगे, उदगीर विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस ईश्वर समगे, अविनाश गायकवाड, आदर्श पिंपरे, सदाम बागवान, धनंजय पवार, नंदकुमार पटणे, निलकंठ बिरादार, लातूर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस श्रीनिवास एकुकैकर, प्रा.गोविंद भालेराव, संजयकुमार काळे, नामदेव बिरादार, नाना धुप्पे, माधव कांबळे, ज्ञानेश्वर भांगे, प्रभू पाटील, ज्ञानेश्वर बिरादार, पाशा पठाण, संतोष भोसले, चंद्रकांत मुस्कावाड, आयुब पठाण, पांडुरंग मुंडे, अमजद पठाण, संभाजी सूर्यवंशी, माधव पाटील, आनंदराव मालवदे, गोविंद गायकवाड, सचिन गायकवाड, रोहिदास मदणूरे, अनिल लांजे, बबन धनबा, योगेश बेलूरे, कांबळे मेघराज, सुनिल पाटील, वैभव पाटील, बारीक पटेल, सतिश पाटील माणकीकर, संतोष वळसणे इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here