शेतकरी आंदोलना संदर्भात भडकाऊ ट्विट | ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल

157

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी आंदोलनाबद्दल भडकाऊ ट्विट केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

पॉप गायिका रिहानानंतर, पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेक जागतिक ख्यातनाम व्यक्तींनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले. त्यानंतर देशातील अनेक सेलेब्रिटीनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण आधी वस्तुस्थिती तपासून घ्यावी, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

ग्रेटा थनबर्ग काय म्हणाली?

रिहानाच्या ट्वीटनंतर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केले. ग्रेटा यांनी ट्विटरवर लिहिले की, “आम्ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांसोबत एकतेने उभे आहोत.”

  • ज्यांना मदत हवी आहे, त्यांच्यासाठी टूलकिट शेअर (सॉफ्टवेयर) केलं आहे. ग्रेटा थनबर्गला 2019 मध्ये अमेरिकन मॅगझिन टाईम्सने ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले होते. 

ग्रेटा चर्चेत आली होती ज्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ग्रेटाचा शाब्दिक चकमक झाली होती.

प्रोपागंडा चालू देणार नाही : गृहमंत्री अमित शाह

पॉप गायक रिहानानंतर ग्रेटा थुनबर्ग, अमेरिकेचे उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाचीसह आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अनेक लोकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

  • शेतकरी आंदोलनावर परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवर गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

  • परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांच्या वक्तव्याला कोट करत त्यांनी लिहलंय की कोणताही प्रोपागंडा देशातील ऐक्य बाधित करू शकत नाही. ते म्हणाले की कोणताही प्रोपागंडा देशाला उंचावर जाण्यापासून रोखू शकत नाही. भारताच्या प्रगतीसाठी सर्वजण एकजूट आहेत.

शेतकरी आंदोलनाला संदर्भात परदेशात बसलेल्या काही शक्ती अजेंडा चालवत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, या विषयांवर कोणतेही मत देण्यापूर्वी, संपूर्ण माहिती मिळवणे चांगले. अर्धवट माहितीवर सोशल मीडियावर व्यक्त केलेल मत हे बेजबाबदार असल्याचा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

काय आहे प्रकरण?

तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. येथे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने तटबंदी केली आहे. सरकारने येथे इंटरनेट सेवाही बंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here