मुंबई | परळीची असलेल्या पुजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली आहे. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली आहे.
पुजा चव्हाणनं विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा होती. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्या महिला नेत्या आणि आघाडी आता आक्रमक झाली आहे. पुजाच्या आत्महत्येला कारण ठरलेल्याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे.