स्वातंत्र्यदिनापासून कोरोनाच्या निर्बंधांमध्ये मिळणार ‘व्यवसायाचे स्वातंत्र्य’

294
Latur lockdown

कोरोनाच्या दीर्घकाळ र्निबधांनंतर १५ ऑगस्टपासून पुणे पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकांना व्यवसायाचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

नव्या नियमांनुसार कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करून दुकाने, मॉल आणि उपाहारगृहे आठवडय़ाचे सर्व दिवस रात्री दहापर्यंत खुली राहणार असून चित्रपटगृहे, नाटय़गृहे आणि मंदिरे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहतील.

दुकाने, उपाहारगृहे, मॉल आणि मंगल कार्यालयांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण होणे बंधनकारक असेल.

उपाहारगृहे आणि बार रात्री दहा वाजेपर्यंत आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.

पार्सलसेवा २४ तास सुरू राहील. प्रतीक्षा काळात मुखपट्टी बंधनकारक राहील.

मॉलमध्ये प्रवेश करताना ग्राहकांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

इनडोअर खेळांसाठी खेळाडू, कर्मचारी व व्यवस्थापकांचे लसीकरण पूर्ण होऊ न १४ दिवस झालेले असणे बंधनकारक आहे.

बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅ श, पॅरललबार, मलखांब या खेळांसाठी केवळ दोनच खेळाडूंना परवानगी असेल.

सर्व जिम, योग केंद्र, सलून-स्पा ५० टक्के क्षमतेने रात्री दहापर्यंत सुरू ठेवता येतील. सर्व मैदाने, उद्याने नियमित वेळेत सुरू राहतील.

विवाह सोहळ्यासाठी खुले कार्यालय, लॉनमध्ये क्षमतेच्या निम्मी तर जास्तीत जास्त दोनशे, बंदिस्त कार्यालय अथवा उपाहारगृहांसाठी क्षमतेच्या निम्मी फ्रीडम’तर जास्तीत जास्त शंभर इतकीच उपस्थित बंधनकारक राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here