Pune Crime News |13 वर्षीय मुलाची आत्महत्या; कारण ऐकून पोलिसांना बसला धक्का

190

समाजात अलीकडे आत्महत्येची कारणं पाहून सामान्य माणूस चक्रावून जात आहे. पुण्यात अशीच एक सुन्न करणारी घटना घडली आहे.

एका क्षुल्लक कारणांवरून एका 13 वर्षाच्या मुलाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ही घटना पुण्यातील (Pune) चिखली परिसरात घडली आहे. या घटेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगा हा टीव्हीवर कार्यक्रम बघत होता.

यावरून त्याची सावत्र आई त्याच्यावर रागावली. यामुळे मृत झालेल्या मुलाला राग व नैराश्य आले, याच नैराश्यातून त्याने ओढणीने गळफास लावून घेतला. घरात बेशुद्धावस्थेत आढल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेचा स्थानिक पोलीस आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

रमजान अब्दुल शेख, असे मृत मुलाचे नाव होते. रमजानला तासनतास टीव्ही पाहण्याची सवय होती. दरम्यान, टीव्ही पाहतो म्हणून रमजानची सावत्र आई त्याच्यावर रागावली. याच नैराश्यातून रमजाने मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास रमजानने ओढणीने गळफास घेतला.

दरम्यान, प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. यामुळे रमजानच्या कुटुंबीयांवर दुख: चा डोंगर कोसळला आहे. तसेच याप्रकरणी स्थानिक पोलिसांना अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. लॉकडाऊन दरम्यान, रोजगार सुटल्याने तसेच कोरोनाच्या भितीने पुण्यातील अनेक लोकांनी आत्महत्या केल्याची अनेक घटना समोर आल्या आहेत. यात वरील घटनेने आणखी भर घातली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here