पंजाब व नांदेड पोलिसांची कारवाई | पंजाबचा दहशतवादी नांदेडातून अटक; आयबी, एटीएस आणि एसआयडी अनभिज्ञ

167

नांदेड : पंजाब येथील अमृतसरमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या एका आरोपीला रविवारी (दि. आठ) नांदेड येथून अटक करण्यात आली. (Punjab and Nanded police action Punjab terrorist arrested from Nanded)

पंजाब पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. गुरदिपसिंग बागी असे त्याचे नाव आहे. अटकेनंतर न्यायालयात हजर करुन प्रवाशी रिमांडवर त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पंजाब पोलिसांनी खलीस्तान जिंदाबाद संघटनेशी संबंधित चार जणांविरुद्ध बंदी आदेश जारी केले होते. त्यापैकी एक जण नांदेड येथे असल्याची गुप्त माहिती पंजाब राज्य पोलिस दलाला मिळाली होती.

  • त्या अनुषंगाने पंजाब पोलिस नांदेड येथे आले होते. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाब पोलिसांच्या मदतीने नांदेड तहसील कार्यालय परिसरातून आरोपीला सात फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता ताब्यात घेतले. त्यानंतर प्रवाशी रिमांडवर त्यास पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

An alleged Khalistan supporter was arrested on 7th February. Punjab CID had traced his location and informed us. He is being taken to Punjab: Nanded Police#Maharashtra pic.twitter.com/VmM5sCLLA7

— ANI (@ANI) February 9, 2021

त्या चौघांविरुद्ध पंजाब येथे 18/2020 प्रमाणे कलम 13, 17, 18, 18- बी, 20 युए (पी) आर/डब्ल्यू 25/54/59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुरदिपसिंग बागी ( वय 37) राहणार गुरुसर, जिल्हा मुक्तसरसाहिब, पंजाब असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. यावेळी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व पंजाब पोलिस पथक अधिकारी व त्यांचे कर्मचारी सामील होते.

पंजाब पोलिसचे दोन दिवस गोपनियने ऑपरेशन

आरोपीच्या शोधासाठी नांदेड येथे आल्यानंतर पंजाब येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्याशी चर्चा केली.

त्यानंतर पंजाब पोलिसांच्या पथकाने कायदेशीर कागदपत्रे पोलिस अधीक्षकांसमोर सादर करुन त्यांना सविस्तर माहिती दिली.

यानंतर पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यावर या आरोपीस पकडण्याची जबाबदारी सोपविली.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती व पंजाब पोलिसचे इन्टेलिजन्ट पथकाकडून नांदेडमध्ये दोन दिवस गोपनियने ऑपरेशन चालवले. यानंतर या पथकाने त्याला अटक केली.

आयबी, एसआयडी आणि एटीएस पथक अनभिज्ञ

नाांदेड शहरात मागील काही दिवसांपासून वास्तव्यास असलेला पंजाबचा दहशतवादी पंजाब पोलिसांनी अटक केला. मात्र नांदेड पोलिस व संबंधीत गुप्त विभागाला याचा थोडाही कानोसा नव्हता.

पंजाब पोलिसांच्या कारवाईमुळे वरिल विभागांची झोप उडाली आहे. दहशतवादी नांदेडसारख्या शहरात वास्तव्य करुन राहत असेल तर मग या विभागाना कशी माहिती नाही. असा प्रश्न उपस्थित होत आहे. विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here